Hingoli Earthquake : हिंगोलीत भूकंपाचे धक्के; सुदैवाने जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात आज सोमवारी (दि. 20) पहाटेच्या ( Hingoli Earthquake) सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप सौम्य स्वरूपाचा असल्याने यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने याबाबत माहिती दिली आहे हिंगोली जिल्ह्यात सोमवारी पहाटे पाच वाजून नऊ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे तीव्रता रिश्टर स्केलमध्ये 3.5 एवढी होती.

सुरुवातीला भूकंपाचे धक्के जाणवतात नागरिक घाबरले. काही नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. काही वेळानंतर पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र भूकंपाची तीव्रता कमी असल्याने सुदैवाने यामध्ये ( Hingoli Earthquake) कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.