Pune : पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक कमालीचे अस्वस्थ

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार (Pune)असे 2 गट निर्माण झाल्याने पुण्यातील माजी नगरसेवक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीत या पक्षाचे 41 नगरसेवक निवडून आले होते.

सध्या राष्ट्रवादीत 2 गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे (Pune)उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत जावे की, शरद पवार यांच्या सोबत असा प्रश्न या नगरसेवकांना पडला आहे. अजित पवार यांच्या सोबत जाणाऱ्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे. तर, शरद पवार आता नव्याने पक्ष बांधणीवर जोर देणार असल्याची कुजबुज आहे. 2017 मध्ये भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले होते.

Khed : उघड्या दरवाजावाटे एक लाख रुपयांचे दागिने चोरी, आरोपी अटकेत

त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम माजी विरोधी पक्षनेते (Pune)चेतन तुपे पाटील, दिलीप बराटे आणि दिपाली प्रदीप धुमाळ यांनी केले आहे. वरील नगरसेवकांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मार्गदर्शन आहे. तर, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी बोलाविण्यात आलेल्या बैठकीला केवळ 15 ते 16 नगरसेवक येतात. इतर नगरसेवक अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी बोलविलेल्या बैठकीला जातात.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) सोबत जाण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला. शिवाय त्यांची प्रशासनावर मजबूत अशी पकड आहे. आपले काम होणारच या भावनेतून त्यांच्या सोबत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.