Mahalunge : ट्रेलर चोरून नेणाऱ्या चोराचा केला खून , गुंडा विरोधी पथकाकडून 48 तासात खूनाचा उलगडा

एमपीसी न्यूज – जेवण करण्यासाठी थांबलेला ट्रेलर चोरून नेणाऱ्या (Mahalunge)चोराला ट्रेलर चालकांनी बेदम मारहाण करून फेकून दिले यातच त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.29) महिंद्रा अन्ड महिन्द्रा कंपनी मागे महाळुंगे येथे घडली होती. या खूनाचा गुंडा विरोधी पथकाने 48 तासात छडा लावाल असून दोघांना अटक केली आहे.

दशरथ ऊर्फ सोनू जयराम आडसुळ (वय 21 रा.तुळजापुर, धाराशिव), विष्णु अंगद राऊत (वय 29 रा. बीड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अमोल विकास पवार, (रा. नादुरागा तांडा, ता.औसा)

Pune :निरोगी जीवनासाठी कुटुंबीयांमध्ये सुसंवाद महत्त्वाचा : अभिनेत्री माधुरी दीक्षित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडा विरोधी पथकातील (Mahalunge)अधिकारी व अंमलदार हे आरोपींचा शोध घेत असताना दाखल गुन्हयातील मयत इसमाचे हातावरील बंजारा अशा गोंदणवरुन सदरचा इसम हा लमाण समाजाचा असल्याचे समजले. यावेळी पोलिसांनी मयत अमोलचा साथीदार ड्रायव्हर रोहीदास राजेंद्र चव्हाण (वय 30 वर्षे, चंदा ड्रायव्हर रा. लोहारा, जि. धाराशीव) याकडे केलेल्या तपासावरुन अमोलची ओळख पटली.

त्यानंतर प्रथम ट्रान्सपोर्ट नगर, निगडी, पुणे येथुन ते गुन्हयाचे घटना स्थळापर्यंत चे सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करुन अमोल हा के. एस.बी. चौक, चिंचवड येथे एका ट्रेलरमध्ये चढताना दिसून आला. त्या ट्रेलरचे नंबरवरुन ट्रेलर हा भारव्दाज ट्रेलर सहीसेस यांचा असल्याची माहिती मिळाली. त्यांचेकडे तपास करता ट्रेलरवरील ड्रायव्हर विष्णु अंगद राऊत, दुसरे ट्रेलरवरील ड्रायव्हर विष्णु राऊत याचेबरोबर साथीदार ड्रायव्हर दशरथ ऊर्फ सोनू जयराम आडसुळ व त्यांचा मित्र बलराम जमदाडे हे ट्रेलर पार्क करुन जेवण करण्याकरीता गेले.

यावेळी अमोल पवार हा आरोपींचा ट्रेलर चोरून घेवुन जात असताना त्यांनी त्यास पकडले व त्याच ट्रेलरमध्ये घालुन जबर मारहाण केली. त्यानंतर महींद्रा अॅन्ड महींद्रा कंपनीच्या गेट नं. 8 जवळ मोकळया जागेत नेवुन टाकुन दिले. ड्रायव्हर विष्णु अंगद राऊत व सोनू जयराम आडसुळ हे आपआपले ट्रेलर घेवुन मुंबईच्या दिशेने गेल्याचे समजले. दोन्ही ट्रेलरचे जी.पी.एस.सीस्टीम व्दारे माहीती घेतली असता एक ट्रेलर हा कळंबोली जि. रायगड येथे व दुसरा ट्रेलर हा बोईसर जि. पालघर येथे असल्याचे समजले. गुंडा विरोधी पथकाच्या दोन स्वतंत्र टिम तयार करुन टीम ट्रेलरच्या दिशेने रवाना केले.

आरोपी दशरथ ऊर्फ सोनू जयराम आडसुळ याला रायगड कळंबोली येथून अटक केली तर आरोपी विष्णु अंगद राऊत याला पालघर येथुन ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे तपास करुन त्यांचा साथीदार बळीराम वसंत जमदाडे मोबाईल नंबर प्राप्त करुन त्या नंबरचे केलेल्या तांत्रीक विश्लेषणावरुन त्याला विठठलवाडी, देहुगाव येथुन ताब्यात घेतले. आरोपींना महाळुंगे पोलीसांच्या ताब्यात पुढील कारवाईकरीता दिले आहे.

ही कारवाई गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक एच व्ही. माने पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रविण तापकिर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, विजय गंभिरे, सुनिल चौधरी, नितीन गेंगजे, शाम बाबा, रामदास मोहीते, शुभम कदम, तौसीफ शेख व टी.ए.डब्ल्यू. वे नागेश माळी यांनी केली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.