Pune : पोलिसांनी पकडला ट्रकभरून गुटखा

एमपीसी न्यूज- शिरूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने कारवाई करत एक ट्रकभरून गुटखा पकडला. या संपूर्ण गुटख्याची किंमत 31 लाख 48 हजार रुपये इतकी आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांना गुटख्याच्या ट्रकची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने पाठलाग करून शिरूर जवळील सतरा कमान पुलाजवळून हा ट्रक ताब्यात घेतला.

या ट्रकमध्ये रॉयल तंबाखूच्या 150 गोण्या तर हिरा मसाल्याच्या 295 गोण्या होत्या. एकूण 31 लाख 48 हजार रुपयांचा हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.