Pune : दारूच्या नशेत किरकोळ वादातून पतीने केला कुर्‍हाडीने वार करून पत्नीचा खून

एमपीसी न्यूज- पतीने दारूच्या नशेत किरकोळ वादातून पत्नीवर कुर्‍हाडीने वार करून तिचा खून केला. ही घटना महम्मदवाडीतील वाडकर मळा येथे उघडकिस आली.

संगीता श्रीकांत चव्हाण (वय 26, मूळ गाव – कर्नाळ सिंदगी विजापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून श्रीकांत कमाल चव्हाण असे पतीचे नाव आहे. त्याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता व श्रीकांत हे दाम्पत्य महंम्मदवाडीतील वाडकर मळ येथे लेबर कँपमध्ये राहण्यास असून दोघे मजूरीचे काम करतात. रविवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला होता. त्या वादातून श्रीकांत दारू पिऊन आला. त्याने संगीतावर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला.

घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खून केल्यानंतर श्रीकांत चव्हाण घटनास्थळावरून पसार झाला आहे. वानवडी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून याप्रकऱणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.