Pune : बालनाट्याला चांगले प्रोत्साहन दिले तर उद्या महान कलाकार देशाला मिळतील – राधिका देशपांडे

एमपीसी न्यूज – ” बालनाट्यासाठी सातत्याने चळवळ उभारणारी माणसे फार (Pune) कमी आहेत. कारण की लहान मुलांना सांभाळणे फार कठीण आहे. परंतु आज आपण बालनाट्याला प्रोत्साहन दिले तर पुढे जाऊन आपल्याला महान कलाकार मिळतील”, असे प्रतिपादन अभिनेत्री राधिका देशपांडे यांनी केले.

Nitin Gadkari : नितीन गडकरींना धमकी देत खंडणी मागणारा दहशतवादी अफसर पाशाला अटक

राधिका देशपांडे यांच्या बालनाट्य शिकवणी ‘राधिका क्रिएशन्स’चा पहिला वर्ग सुरू झाला. त्यानिमित्त ‘एमपीसी न्यूज’ने त्यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

यावर्षी त्यांची टीम हेमलकसा व आनंदवन येथे जाऊन आदिवासी लोकांसमोर ‘पासवड’ आणि ‘मुंगळे चार’ या दोन एकांकी नाटकांचे सादरीकरण करणार आहेत.

दोन्ही नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन राधिका देशपांडे यांनी केले आहे. त्यांचा नाटक दौरा हा 6 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.

राधिका देशपांडे म्हणाल्या “बालनाटयचे महत्व तर अनेक आहेतच. परंतु लहान मुलांना शिकवणे, त्यांची मानसिकता समजून घेणे व त्यांच्या दृष्टिकोनातून नाटक बसवणे हे फार अवघड आहे.

लहानपणी जर एखादा व्यक्ती कुठली कला जोपासत असेल तर तो मोठा होऊन अतिशय सक्षम व कर्तृत्ववान होतो.”

“नाटकांची परंपरा सांभाळण्यासाठी आपण नाट्यात स्वतःचा वेळ व श्रम गुंतवणे गरजेचे आहे. तरच भारतीय नाटकाची परंपरा सुरक्षित राहील.

नाट्यकला ही सर्वात कठीण कला आहे. कारण यामध्ये नृत्य, संगीत आणि अभिनय या सर्व गोष्टी येतात आणि नाट्यामध्ये चांगले होण्यासाठी बऱ्याच वर्षांचा सराव करावा लागतो.”

“नाट्य सृष्टीच्या विविध घटकांमध्ये आवड जोपासणारी मुले या पिढीमध्ये कमी आहेत. मुले असली तरीही त्यांना शिकवणारी आणि समजून घेणारे लोक फार कमी आहेत.

बालनाट्याला पाहिजे तेवढे महत्व प्रत्येक कलाकाराने द्यावे व एकदा भविष्यासाठीही विचार करावा” असेही त्या म्हणाल्या.

सध्या चालू असलेल्या पिंपरी चिंचवड परिसरातील सभागृहांच्या भाडेवाढ या विषयावर प्रकाश टाकताना त्या म्हणाल्या, ” कलाकारांच्या आर्थिक परिस्थितीला लक्षात घेता भाडे जास्त असणे हे चांगले नाही .

जरी भाडे वाढवावे लागलेच तरी नाट्यगृहाच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून उत्कृष्ट सेवाही आम्हाला अपेक्षित (Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.