Nitin Gadkari : नितीन गडकरींना धमकी देत खंडणी मागणारा दहशतवादी अफसर पाशाला अटक

एमपीसी न्यूज -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 100 कोटींची खंडणी मागून बॉम्बस्फोटमध्ये उडविण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्याचा सूत्रधार लष्कर ए तोयबा आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा माजी सचिव अफसर पाशा  असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.त्याला नागपूर पोलिसांनी बेळगाव कारागृहातून ताब्यात घेतले आहे.आता त्याची आणि जयेश पुजारी याची समोरासमोर चौकशी (Nitin Gadkari ) करण्यात येणार आहे. 

Pune : ‘कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटंट’ प्रवेशाची मुदत 31 जुलैपर्यंत

नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात 4 जानेवारी आणि 21 मार्च  धमकीचे फोन आले. तेव्हा कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती.

बेळगाव तुरुंगातून धमकीचे फोन आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.  त्यानंतर नागपूर पोलिसांनी 28 मार्च रोजी जयेश पुजारी उर्फ शाकीरला बेळगाव तुरुंगातून ताब्यात घेऊन नागपुरात आणले होते.

नागपूर पोलिसांच्या चौकशीत जयेश पुजारीने सुरुवातीला दिशाभूल केली. मात्र त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीमध्ये धमकीच्या कॉल्सचे सूत्रधार वेगळेच असल्याची शक्यता निर्माण झाली होती.

पोलिसांनी मग त्यांचा तपास त्या दिशेने सुरु झाला.

गडकरींच्या कार्यालयात  21 मार्च रोजी दुसऱ्यांदा धमकीचा फोन आला. खंडणीसाठी कर्नाटक मधील एका तरुणीचा मोबाईल क्रमांक देण्यात आला होता.

तेव्हा पोलिसांनी त्या तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या  तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारावर बशीरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा हा यामागचा खरा सूत्रधार असल्याचं समोर आले.

अफसर  हा 2012 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबासाठी दहशतवाद्यांची भरती करायचा. तो दोष सिद्ध आरोपी आहे.

पुजारीचे अफसरसोबतच्या संपर्काचे काही ठोस पुरावे नागपूर पोलिसांना मिळाले.  त्यामुळे अफसरला सहआरोपी करण्यात आले.

जयेश पुजरीच्या मार्फत गडकरींंना धमकी  देण्यामागे लष्कर ए तोयबाच्या या कुख्यात दहशतवाद्याचा काय हेतू होता याची चौकशी सध्या पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

तसेच अफसर पाशाला नागपुरात आणल्यानंतर पोलीस पाशा आणि जयेशला समोरासमोर बसून चौकशी करणार आहेत.

तेव्हाच या धमकी प्रकरणातील सत्य बाहेर येण्यास मदत (Nitin Gadkari ) होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.