Dapodi : सीआयआरटीमध्ये चालकांना थ्रीडी इमेजिंगद्वारे प्रशिक्षण, नितीन गडकरी यांच्या हस्ते सुरुवात

एमपीसी न्यूज – दापोडी येथील केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेत (Dapodi) (सीआयआरटी) दोन आधुनिक व्हर्च्युअल रिअॅलिटी सिम्युलेटर बसविण्यात आले आहेत. त्याच्या सहाय्याने वाहनचालकांना थ्रीडी इमेजिंग पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. सिम्युलेटरचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संयुक्त सचिव संकेत भोंडवे उपस्थित होते.  सर्वाधिक अपघात मानवी चुकांमुळे होतात. रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय उपाययोजना करते.

रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांचे समुपदेशन आणि जनजागृती केली जाते. पण, आता अपघात रोखण्यासाठी चालकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

यासाठी भोसरीतील केंद्रात दुचाकी, मोटार आणि हलक्या (एलएमव्ही) आणि अवजड (एचएमव्ही) वाहनांचे प्रशिक्षण देता यावे यासाठी दोन सिम्युलेटर बसविण्यात आले आहेत. त्याद्वारे चालकांना निरनिराळ्या, वातावरणात, परिस्थितीत आणि ठिकाणी वाहन चालवताना येणारे अनुभव थ्रीडी इमेजिंगद्वारे घेता येणार आहेत.

हे आहेत फायदे (Dapodi)

नवीन चालकांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देताना ब-याचवेळा अपघाताची शक्यता असते. वाहनांच्या नुकसानाची शक्यता असते. सिम्युलेटरच्या सहाय्याने प्रशिक्षण घेताना कसलाही धोका असणार नाही.

Alandi : राष्ट्रवादीला 18 व्या वयाऐवजी 25 वे वयच धोक्याचे लागले : जगन्नाथ बाप्पू शेवाळे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.