Moshi : अनधिकृत पत्राशेडवर महापालिकेची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी -चिंचवड महापालिका क क्षेत्रीय (Moshi) कार्यालय, अतिक्रमण पथकाच्या मार्फत प्रभाग क्र.02 मधील बो-हाडेवाडी, मोशी परिसरातील सुमारे 3000 चौ.फ़ुट क्षेत्रातील पत्राशेडवर अतिक्रमण निष्कासनाची आज कारवाई करण्यात आली.

आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे – पाटील , शहर अभियंता मकरंद निकम यांचे निर्देशानुसार कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, उप.अभियंता सुर्यकांत मोहिते, यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता चंद्रकांत पाटील,प्रियांका म्हस्के, रचना दळवी व मनपा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल, महाराष्ट्र पोलिस, यांच्या नियंत्रणाखाली सदर कारवाई करण्यात आली.

प्रभाग क्र.02 मधील बो-हाडेवाडी, मोशी परिसरातील 3000 चौरस फुट पत्राशेडवर अतिक्रमण निष्कासनाची तसेच अनाधिकृत बॅनर्स (Moshi) काढण्यात आले.

या कारवाईत क क्षेत्रीय अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक, सहभागी झाले होते. दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे.

नागरिकांनी रस्त्यावर बेवारस वाहने उभी करुन नये तसेच अनधिकृत टप-या व पत्राशेड व बॅनर्स उभारु नये. तसेच फ़ुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, महानगरपालिका आयुक्त यांच्या निर्देशनानुसार सदर कारवाई केलेल्या ठिकाणी मनपा परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड / बांधकाम करु नये, अशा सुचना देण्यात आल्या.

Dapodi : सीआयआरटीमध्ये चालकांना थ्रीडी इमेजिंगद्वारे प्रशिक्षण, नितीन गडकरी यांच्या हस्ते सुरुवात

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.