Alandi : राष्ट्रवादीला 18 व्या वयाऐवजी 25 वे वयच धोक्याचे लागले : जगन्नाथ बाप्पू शेवाळे

एमपीसी न्यूज – आळंदी (Alandi) येथील ज्ञानदर्शन धर्मशाळेतील सभागृहात दि.15 रोजी आज राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बाप्पू शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली खाली पार पडली. यावेळी त्यांच्या जिल्हाध्यक्ष नियुक्ती बदल त्यांचा सत्कार काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी केला.

Pimpri Chinchwad RTO : अवाजवी भाडे घेणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांविषयी तक्रार करा

यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे राष्ट्रवाटी फुटी गटाबाबत म्हणाले, 18 वर्ष धोक्याचं असत पण इथं 25 वे वर्ष धोक्याचं ठरलं.ज्यांना पहिल्या पासून संभाळल तेच पक्ष सोडून गेले. परंतु जनता शरद पवार यांच्या पाठीमागे आहे. तसेच त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाला जे उमेदवार सोडून गेले त्यांच्या राजकीय कारकिर्दीची अवस्थेची माहिती यावेळी दिली. निवडणूक आयोगाचा पक्षाबाबत निर्णय काय होईल हे सांगता येणार नाही. यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र, तेच नेते भाजप सोबत सत्ताधारी पक्षात केल्यावर त्यांना मंत्री पदे मिळाली.

एक तर सत्तेत (भाजप सोबत )या किंवा तुरुंगात जा अशी अवस्था सत्ताधारी पक्षाने केली. त्या भीतीनेच ते तिकडे केले.तसेच त्यांनी भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यावर टीका केली. येथील स्थानिक ज्येष्ठ मंडळींवर आळंदी शहर राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार गट)नवीन कार्यकरणी निवड पदाची जबाबदारी देण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले पक्ष संघटन कसे हवे याबाबत त्यांनी माहिती दिली.

यावेळी बबनराव कुऱ्हाडे, वासुदेव आप्पा घुंडरे,राहुल चिताळकर, विलास घुंडरे,बाबूलाल घुंडरे,नंदकुमार वडगांवकर,श्रीधर कुऱ्हाडे,रवींद्र कुऱ्हाडे, उत्तमराव कुऱ्हाडे, जनार्धन पांढरे,उमेश रानवडे,सुनील रानवडे,संभाजीराजे कुऱ्हाडे,भाऊसाहेब कोळेकर,विलास कुऱ्हाडे,नंदू वहिले,गोरक्षनाथ वहिले,ज्ञानेश्वर वहिले,बाळासाहेब डफळ,सिद्धेश कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सतिष कुऱ्हाडे, समीर कुऱ्हाडे ,सागर कुऱ्हाडे,पुष्पाताई कुऱ्हाडे,मालन घुंडरे,उषाताई नरके व इतर मान्यवर उपस्थित होते.

या गेल्या पंचवार्षिकमध्ये जे एकमेकांच्या विरोधात प्रचार करत होते.त्या व्यक्ती या ठिकाणी एकत्रित आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. गावच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहत, विरोधात प्रचार करत एकमेकांच्या विरोधात काहींनी भूमिका बजावल्या. तेच एकत्र येतात हे आळंदी शहराला नवीन नाही.गावच्या या राजकारणावर नेहमीच चर्चा होत असते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.