Pimpri Chinchwad RTO : अवाजवी भाडे घेणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांविषयी तक्रार करा

पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातून (Pimpri Chinchwad RTO ) गावी जाणाऱ्या प्रवाशांकरिता खासगी बसेसनी अवाजवी भाडेआकारणी केल्यास त्याबाबतच्या तक्रारी किंवा पुरावे परिवहन विभागाला द्यावेत, असे आवाहन पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले, “खासगी बसेसची सेवा पुरविणारे वाहतूकदार संबंधित मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे आकारण्यात येणाऱ्या भाड्याच्या कमाल दीडपट पर्यंत भाडे आकारू शकतात. खासगी बसेस वाहतूकदार कोणाही प्रवाशांकडून निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारल्याचे किंवा घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा आढळून आल्यास अशा वाहतूक पुरवठादारांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत खटला दाखल होऊ शकतो याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

Maval : बोरवली येथे श्रमदानातून वनराई बंधारा तयार

गणेशोत्सवानिमित्त खासगी बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची भाड्यात लूट होवू नये याकरिता शासनाने दर निश्चित (Pimpri Chinchwad RTO) करण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातून गावी जाणाऱ्या प्रवाशांकरिता खासगी बसेसनी अवाजवी भाडेआकारणी केल्यास त्याबाबतच्या तक्रारी किंवा पुरावे परिवहन विभागाच्या ई मेल आयडी वर किंवा या कार्यालयाच्या ईमेल आयडी [email protected] वर प्रवाशानी द्यावेत, असे आवाहन पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

अवाजवी भाडे आकारल्या तक्रारी आल्यास अशा बसेसवर मोटार वाहन कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मोटार वाहन निरीक्षक यांना देण्यांत आलेले आहेत. अवाजवी भाडे आकारणाऱ्या बस वाहतूक दारांविषयी तक्रार करता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.