Alandi: जे भाजपला जमल नाही ते अजित पवारांच्या माध्यमातून भाजप करण्याचा प्रयत्न करत आहे-रोहित पवार

एमपीसी न्यूज – आज आळंदी मध्ये राष्ट्रवादी चे आमदार रोहित पवार(Alandi) यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले.यावेळी अनेक राष्ट्रवादी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. देवस्थानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

अजित पवार यांनी केलेले वक्तव्य ते म्हणजे मला वेगळं पाडण्यात (Alandi)आले आहे अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली त्यावर प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले आश्चर्य वाटणारे ते व्यक्तव आहे. दादा भावनिक साद देतील ही अपेक्षा नव्हती. खर तर दादांनी जो निर्णय घेतला हा सामान्य लोकांना पटला नाही.तसं पाहिलं तर कुटूंबाला ही पटलेलं नाही.काल त्यांनी व्यक्तव बोलून दाखवले ,माझं प्रामाणिक मत आहे दादांनी जो निर्णय घेतला ,तो कोणालाही आवडला नाही.काल बोलत असताना दादा हे बोले आहेत मी पवार साहेबांचा मुलगा असतो, त्यांना वेगळं काही मिळालं असत.

Dehu: भंडारा डोंगरावरील मंदिर वारकरी संप्रदायातील पहिले आदर्शवत मंदिर ठरणार – पांडुरंग महाराज गिरी

खर तर मंत्री पदे त्यांना मिळाली.उपमुख्यमंत्री मिळालं. महाराष्ट्रातले प्रमुख निर्णय घेण्याची जबाबदारी होती.अश्या परिस्थिती मध्ये अजून काय वेगळे पाहिजे होते?पदाचेच ते बोलत होते.त्यांना पदच पाहिजे होती का?आज बीजेपी कडे जाण्याचे कारण पदच आहे का?असा विषय राहत नाही का?असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

जे भाजप ला जमलं नाही ते दादांच्या माध्यमातून भाजप करण्याचा प्रयत्न करत आहे. पवार विरुद्ध पवार हा एक संघर्ष भाजपला जो अनेक वर्षांपासून उभा करायचा होता(आपल्या कडील नेत्याकडून करायचा होता) तो दुर्देवाने शेवटचा प्रयत्न दादांकडून करत आहेत.

बारामती लोकसभेत सुनेत्रा वहिनी विरुद्ध सुप्रिया ताई अशीच लढत होईल,असं जवळपास निश्चित मानलं जातंय. सुनेत्रा काकींचा प्रचार जवळपास सुरू झालाय याविषयी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले आम्ही वाट बघत आहे, अधिकृत रित्या त्यांचं नाव किंवा दुसरं कोणी उमेदवार असेल त्याचे नाव जाहीर व्हावं.अधिकृत रित्या जेव्हा जाहीर होईल.त्या नंतरच पुढे प्रचार सुरू करणार आहोत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.