Dehu: भंडारा डोंगरावरील मंदिर वारकरी संप्रदायातील पहिले आदर्शवत मंदिर ठरणार – पांडुरंग महाराज गिरी

एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर जगदगुरु तुकोबारायांच्या कार्याला (Dehu)साजेशे असे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे कार्य सुरु असून श्री विठ्ठल रखुमाई, तुकाराम महाराज, भंडारा डोंगर ट्रस्टच्या माध्यामातून सर्वाच्या आशीर्वादाने व सहकार्याने हे मंदिर साकार होत आहे.

या ट्रस्टचे सर्व विश्वस्त, कार्यकर्ते, वारकरी भाविक या सर्वाची (Dehu)अनेक वर्षांची असणारी तळमळ, तपश्चर्या यास साक्षात श्री पांडुरंग परमात्माच साथ देत असुन सत्य संकल्पाचा दाता नारायण | करी पूर्ण सर्व मनोरथ || जगदगुरु संत तुकोबारायांच्या या अभंगवचनानुसार आपणा सर्वांचे मनोरथ लवकरच पूर्ण होतील. तसेच या मंदिराचे जेंव्हा 100 टक्के बांधकाम पूर्ण होईल तेव्हा ही भंडारा डोंगराची पवित्र अशी भूमी अखिल वारकरी संप्रदायासाठी जणू स्वर्गच असेल, हे भव्य-दिव्य मंदिर वारकरी संप्रदायातील पहिले असे आदर्शवत मंदिर असेल अशी भावना हभप पांडुरंग महाराज गिरी यांनी भंडारा डोंगरावर व्यक्त केली.

नसताची दाऊनी भेव l केला जीव त्रिपुटी ll तुका म्हणे केली अहीरणी l सलगीच्यांनी सन्मुख ll जगद्गुरु, संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या या अभंगावर निरूपण करीत हभप गिरी महाराजांनी पुढे सांगितले की या मृत्यू लोकात सर्वांचे जीवन दुःखी आहे. सुखी कोणीच नाही. दुःख देणारा, दुःखाचा निर्माता संसार आहे. संसार हाच दुःखाचा जनक आहे. संसार म्हणजेच दुःख आणि दुःख होते ते केवळ संसारामुळेच. या दुःखावर उपाय शेवटी एकच तो म्हणजे संत उपदेश. संतांच्या संगतीत बोध मिळतो. त्या बोधामुळे उद्धार होतो. मनुष्य उद्धारासाठी संत संगत, संतांचा उपदेश हा महत्त्वाचा आहे असे महाराजांनी सांगितले.

Pimpri : गांजा विक्री प्रकरणी दोन महिलांना अटक

दररोजच्या प्रमाणे काकडा आरती, अभिषेक, महापूजा, हरिपाठ, गाथामूर्ती नानामहाराज तावरे यांच्या सुमधुर वाणीतून गाथा पारायण संपन्न झाले. सायंकाळी हभप आचार्य रविदासमहाराज शिरसाठ यांनी कैवल्यमूर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर तत्वचिंतन पर निरूपण केले.

तळेगाव दाभाडे येथील एमआयटी संस्थेच्या मायमर मेडिकल कॉलेजच्यावतीने या सोहळ्याच्या निमित्ताने श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर येणाऱ्या सर्व भाविकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर 16 ते 21 फेब्रुवारी या कालावधी आयोजित करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात मधुमेह, नेत्र व अस्थी रोग तपासणी करण्यात येत असून आज सुमारे 300 पेक्षा जास्त भाविकांच्या सदर तपासण्या करण्यात आल्या. मायमर मेडिकल कॉलेजच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. दर्पण महेशगौरी, डॉ. अभय तोफखाने, डॉ. राहुल वखारिया, डॉ. नेहा गरुडकर, डॉ. करीना दलवाई हे वैद्यकीय अधिकारी आरोग्य तपासणी शिबिरासाठी कार्यरत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.