Pimpri : गांजा विक्री प्रकरणी दोन महिलांना अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने (Pimpri)दोन महिलांना अटक केली. त्यांच्याकडून दोन किलो 230 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 15) सायंकाळी भाटनगर पिंपरी येथे करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार रणधीर माने यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात(Pimpri) फिर्यादी दिली आहे. त्यानुसार दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातून इंदिराजी आणि नर्गिस दत्त यांची नावे वगळल्याचा निषेध-मोहन जोशी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाटनगर पिंपरी येथे दोन महिला गांजा विक्रीसाठी आल्या असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख 16 हजार 560 रुपये किमतीचा दोन किलो 230 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.