Pune : बनावट चलनी नोटा बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – बनावट चलनी नोटा बाळगल्या (Pune)प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख 10 हजार रुपये मूल्याच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. 16) दुपारी बोडकेवाडी फाटा, माण हिंजवडी रोड येथे करण्यात आली.

अभिषेक राजेंद्र काकडे (वय 20), ओंकार रामकृष्ण टेकम (वय 18, दोघे रा. हिंजवडी) अशी (Pune)अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार श्रीकांत चव्हाण यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

 

Pune : महाविकास आघाडीचा 24 फेब्रुवारी रोजी महामेळावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माण हिंजवडी रोडवर बोडकेवाडी फाटा येथे संशयितरित्या तिघेजण थांबले असून त्यांच्याकडे बनावट चलनी नोटा आहेत, अशी माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख 10 हजार रुपये मूल्याच्या भारतीय चलनातील बनावट नोटा जप्त केल्या. अभिषेक आणि ओंकार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.