Pune : महाविकास आघाडीचा 24 फेब्रुवारी रोजी महामेळावा

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Pune)महाविकास आघाडीचा महामेळावा दिनांक 24 फेब्रुवारी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चारही मतदारसंघातील (Pune)कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी महाविकास आघाडीने सुरू केली आहे.

Kelgaon: बीजेपी कडे खऱ्या अर्थाने ताकद असती ,लोकमत, जनमत असते तर त्यांनी कुटूंब फोडली नसती पार्टी फोडल्या नसत्या-रोहित पवार

या निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारही लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसकडे 20 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

त्यामध्ये प्रबळ दावेदार म्हणून पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेत 2 गट पडल्यावर प्रथमच महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्याने त्यांच्या इच्छुक उमेदवारांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.