Maval : कामगाराने तिजोरीसह पळवली 14 लाख 50 हजारांची रोकड

एमपीसी न्यूज – कंपनीत काम करणाऱ्या कामगाराने (Maval )तिजोरीसह 14 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 30 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत जापलूप इक्वेस्ट्रियन सेंटर प्रा ली सोमाटणे टोल नाक्याजवळ मावळ येथे घडली.

रोहन समीर मोरे (वय 43, रा. तळेगाव दाभाडे) यांनी (Maval )याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अकील गुलाब शेख (वय 24, रा सोमाटणे, मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : महाविकास आघाडीचा 24 फेब्रुवारी रोजी महामेळावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोरे यांनी त्यांच्या कंपनीमध्ये जमा झालेली रोख रक्कम एका तिजोरी मध्ये ठेवली होती. अकील शेख हा त्यांच्या कंपनीमध्ये काम करत होता. त्याने रोख रक्कम ठेवलेली तिजोरी आणि तिजोरीतील 14 लाख 50 हजार रुपये रक्कम चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.