Pune :अभय योजने बाबत अद्याप निर्णय नाही -विक्रम कुमार

एमपीसी न्यूज – मोकळ्या जागा मालकांकडे असलेल्या (Pune)थकबाकीच्या रकमेत तडजोड करत 80 टक्के रक्कम कमी करण्यासंदर्भातील प्रस्तावित अभय योजनेवर राजकीय पक्षांनी तीव्र विरोध केला .

त्या पार्श्वभूमीवर पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी खुलासा करताना (Pune)म्हटले आहे की, अभय योजने संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. अभय योजना संदर्भात शहरातील मोकळ्या भूखंडांची संख्या किती आहे, त्यांचे क्षेत्रफळ किती आहे, त्यावर मिळकतकराची थकबाकी किती आहे, याची सखोल माहिती घेतल्यानंतरच अभय योजना राबवायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असेही आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

 

Pune : बनावट चलनी नोटा बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

सविस्तर माहिती संकलीत करूनच त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

मोकळ्या जागा बांधकाम व्यावसायिक, विकसकांकडेच आहेत, असे नाही. सर्वसामान्य नागरिकांकडेही लहान भूखंड आहेत. ही योजना मान्य झाल्यास त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनाही होणार आहे.

पण, अद्यापही ही योजना मंजूर झालेली नाही. त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. पुणे शहरात नेमक्या किती मोकळ्या जागा आहेत. त्यापैकी किती भूखंडांचा मिळकतकर थकीत आहे. भूखंडांचे क्षेत्रफळ किती आहे, लहान भूखंडांची संख्या किती, मोठ्या आकाराच्या भूखंडांची संख्या किती याची सविस्तर माहिती संकलीत केली जाणार आहे. ही माहिती तपासूनच योजना राबवायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असेही आयुक्त म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.