Alandi : आळंदी मध्ये जितेंद्र आव्हाडांच्या व्यक्तव्याचा जाहीर निषेध

एमपीसी न्यूज -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Alandi)आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध भारतीय जनता पार्टीच्या वतीने दि.5 रोजी काल शुक्रवारी आळंदी शहरात करण्यात आला.

महाद्वार चौक येथे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतीकात्मक(Alandi) पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त करून त्यांच्या त्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.व मान्यवरांनी त्याबाबत मनोगत व्यक्त केले.

Chinchwad : नाट्य कलावंतांसोबत पारंपारिक लोककलांनी सजली नाट्य दिंडी

 

यावेळी भाजपचे पदाधिकारी राम गावडे,किरण येळवंडे,आकाश जोशी,युवा मोर्चा अध्यक्ष वासुदेव तुर्की,ओ बी सी अध्यक्ष भागवत काटकर,महिला अध्यक्ष संगीता फपाळ,प्रमोद बाफना,माऊली बनसोडे,चारुदत्त प्रसादे,राहुल घोलप,मीना चव्हाण,संकेत वाघमारे,सचिन सोळंकर, सोनू पोफळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.