Chakan : मुलगा होत नाही म्हणून विवाहितेचा छळ ; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – चार मुली झाल्या मात्र मुलगा झाला नाही या (Chakan)कारणावरून पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला.

त्यांच्या या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी मयत महिलेच्या पतीला अटक केली आहे. हा सारा प्रकार मंगळवारी (दि.2) चाकण येथील खंडोबा माळ येथे घडला.

याप्रकरणी शाम मोहन लंचू गुप्ता (वय 28 रा चाकण) यांनी (Chakan)चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी पती सचिन सुभाष गुप्ता याला अटक केली आहे. तसेच सासरे सुभाष देवनारायण गुप्ता व महिला आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : नाट्य कलावंतांसोबत पारंपारिक लोककलांनी सजली नाट्य दिंडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण हिला आरोपींनी माहेरून पैसे आणण्यासाठी सुरुवातीला त्रास दिला व त्यानंतर चार मुली झाल्या पण मुलगा झाला नाही या कारणावरून तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.

सासरच्या मंडळीच्या सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी मंगळवारी गळफास घेत आत्महत्या केली. यावरून चाकण पोलिसांनी एकाला अटक केली असून पोलीस पुढील घटनेचा तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.