Talegaon Dabhade : सर्व धर्मातील चांगुलपणा म्हणजे भारतीय संस्कृती – डॉ. श्रीपाल सबनीस

एमपीसी न्यूज – “माणसाचे बंधुतेत रूपांतर करण्याचे काम भारतीय (Talegaon Dabhade)संस्कृतीने केले आहे. धर्म ही शुद्ध कल्पना आहे. मुक्तीची कल्पना आहे. सर्व धर्मातील चांगुलपणा म्हणजे भारतीय संस्कृती होय. चांगुलपणाची विभागणी करून चालत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानेश्वरांच्या ओवीला बहिष्कृत भारतात डोक्यावर घेतात, हा संवाद आपण लक्षात घेणार आहोत की नाही,” असे प्रतिपादन 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

Chinchwad : नाट्य चळवळीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावे – उदय सामंत

तळेगाव दाभाडे येथे इंद्रायणी विद्या मंदिर संस्था (Talegaon Dabhade)आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेत तिसऱ्या सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आर्थिक विकास मंडळ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर होते.

यावेळी व्यासपीठावर इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, उपाध्यक्ष दीपक शहा, गोरखभाऊ काळोखे,कार्यवाहक चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा,सदस्य गणेश खांडगे,संदीप काकडे,युवराज काकडे, रणजीत काकडे,विलास काळोखे, निरुपा कानिटकर, स्थानिक विकास समिती सदस्य परेश पारेख, माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य संदीप भोसले, डी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य जी एस शिंदे, अन्य संस्था पदाधिकारी तसेच तळेगाव पंचक्रोशीतील नागरिक,पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ईटकर म्हणाले की, “ज्ञान ही एकमेव अशी गोष्ट आहे की ती जगाचे नेतृत्व करू शकते. सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी व देशाचा विकास करण्यासाठी ज्ञानाशिवाय पर्याय नाही. भारत-चीन ग्रीसमध्ये संस्कृती आणि ज्ञानाची निर्मिती झाली. भारत जगाचे नेतृत्व करू शकेल पण त्यासाठी एका दिशेची गरज आहे.

ती दिशा विद्यार्थ्यांनी ओळखणे गरजेचे आहे. आपल्या देशात जवळपास 80 टक्के लोक सबसिडीवर तर 35 ते 40 टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली जागतात हे विदारक चित्र नाकारता येत नाही. प्रगत राष्ट्रांनी शिक्षण आरोग्य याकडे विशेष लक्ष दिले आहे. आज भारताचा नंबर शंभरच्या आत नाही, या ठिकाणी जास्त काम करण्याची गरज आहे. भारत ज्ञान निर्मिती करून जगाचे नेतृत्व निश्चितच करेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना सबनीस म्हणाले, “दारुबाज पिढी निर्माण झाली तर देश कोणाच्या ताब्यात द्यायचा, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. साने गुरुजींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून ती संस्कृती विचारात घेणे गरजेचे आहे. हिंदू, ख्रिश्चन,बौद्ध, मुस्लिम, जैन आदी धर्मातील संस्कृती आणि विश्वात्मकता विचारात घेतली पाहिजे. येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर यांच्या विचारांची बेरीज करण्याची गरज आहे. सर्व धर्मातील चांगुलपणा म्हणजे भारतीय संस्कृती होय.” भारतीय संस्कृती आणि विश्वात्मकता यांची दर्शन घडवणारी अनेक उदाहरणे सांगितली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्राध्यापक सत्यजित खांडगे आणि हर्षदा पाटील यांनी केले. आभार संस्थेचे सदस्य संदीप काकडे यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.