Thergaon : कमकुवत दोरीमुळे सातव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू , कंत्राटदारा विरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – तुटलेल्या दोरीला गाठ मारून काम चालाऊपणा करणे (Thergaon)एका मजुराच्या जीवावर बेतले आहे. काम करत असताना सातव्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.3) थेरगाव येथील 19 ग्रँड वेस्ट या सोसायटीमध्ये घडली.

याप्रकरणी कंत्राटदार गौरव नवनाथ चव्हाण (वय 30 रा पिंपळे निलख) (Thergaon)याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सूर्यवंशी यांनी फिर्यादी दिली आहे. या अपघातात भानुप्रताप रमेशचंद्र सिंग ( वय 26 रा.पिंपळे निळख) याचा मृत्यू झाला आहे.

Chinchwad : नाट्य चळवळीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावे – उदय सामंत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 ग्रँड वेस्ट या सोसायटीच्या प्लंबिंग चे व मेंटेनन्स चे काम गौरव चव्हाण याला देण्यात आले होते . चव्हाण याचा कामगार भानूप्रताप सिंग हा सातव्या व्या मजल्यावर दोरीच्या झुल्यावर बसून प्लंबिंग चे काम करत होता.

मात्र ही दोरी दोन ठिकाणी तुटून कमकुवत झाली होती. तिला गाठ मारून तसेच काम सुरू ठेवण्यात आले होते. यावेळी दोरी तुटून भानू प्रताप सिंग हा सातवा मजल्यावरून खाली कोसळला यातच त्याचा मृत्यू झाला. कामगारांना सुरक्षेचे योग्य ती साधने व सुविधा न पुरवल्याने कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चव्हाण यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीला अटक केली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.