Talegaon Dabhade : रोटरी आणि नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे मोफत लसीकरण

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने (Talegaon Dabhade ) नगरपरिषदेच्या 350 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मोफत धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण व जंतूचे डोस देण्यात आले.

या वेळी फर्स्ट लेडी अर्चना चितळे, शुभांगी कार्ले,सुलभा मथुरे, माजी अध्यक्ष विश्वनाथ मराठे,अशोक काळोखे,विलास शाह,अरुण बारटक्के,जयवंत देशपांडे,भालचंद्र लेले,मंगेश गारोळे,दीपक शाह,धनंजय मथुरे,अतुल हंपी,निलेश भोसले, प्रभाकर निकम,प्रमोद दाभाडे व इतर क्लब सदस्य उपस्थित होते.

नगरपरिषद सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रकल्प प्रमुख डॉ नेहा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी मुख्य अधिकारी एन के पाटील, क्लब अध्यक्ष उध्दव चितळे,सेक्रेटरी श्रीशैल मेंथे,उपमुख्याधिकारी ममता राठोड,ऑफीस सुप्रिडेंट रवींद्र काळोखे,माजी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे,माजी नगरसेविका नीता काळोखे,आरोग्य अधिकारी मिसाळ, मोरमारे व इतर अधिकारी उपस्थित होते.

अध्यक्ष चितळे यांनी प्रकल्प प्रमुख डॉ नेहा कुलकर्णी यांनी गेली दहा वर्षे अविरत करत असलेल्या प्रकल्पाचे विशेष कौतुक केले.

मुख्य अधिकारी यांनी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांचे प्रकल्प सामान्य घटकाची गरज ओळखून करत असल्याचे गौरवोद्गार काढले.

तसेच येणाऱ्या काळात चांगल्या प्रकल्पांना नगरपरिषद सहकार्य करेल असा शब्द दिला. त्यांनी स्वतः पहिला लसीकरणाचा डोस घेऊन सुरुवात केली.

गीतांजली मोनमाने यांनी सूत्रसंचालन केले,आभार (Talegaon Dabhade ) श्रीशैल मेंथे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.