Pune :  ‘प्रतिमा उत्कट रंग कथा 23’ चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज –  ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी (Pune )  विदयार्थी मंडळाच्या – कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गटाने  ‘आर्टिस्ट कट्टा ‘ या संस्थेच्या सहकार्याने   आयोजित केलेल्या   ‘प्रतिमा उत्कट – रंग कथा 23 ‘ या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ कला दिग्दर्शक श्याम भुतकर यांच्या हस्ते काल झाले.

यावेळी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी,मोहनराव गुजराथी, सुभाषराव देशपांडे,मिलिंद संत, अमित वझे,अस्मिता अत्रे, अमिता पटवर्धन, डॉ. समीर दुबळे, चेतना गोसावी, श्रीनिवास देसाई  इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर श्याम भूतकर यांच्याशी अमित वझे, अस्मीता अत्रे यांनी संवाद साधला.

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे यामधे 80 हून अधिक कलाकारांनी विविध विषयांवर विविध माध्यमातून काढलेली चित्रे प्रदर्शित केली  आहेत.दुसरे वैशिष्टय़ म्हणजे हे कलाकार वय वर्षे 10 ते 85 अशा विविध वयोगटातील आहेत. तसेच विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे यातील काही कलाकार नागरी वस्तीतील आहेत तर काही दिव्यांग माजी सैनिक आहेत.

हे चित्र प्रदर्शन 8 ते 11 जून या काळात बालगंधर्व कला दालन, पुणे सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

प्रदर्शनाबरोबरच प्रत्येक दिवशी अनेक मान्यवर कलाकारांची  प्रात्यक्षिके आणि संवाद सत्रे आयोजित केलेली आहेत. त्यात 9 जून रोजी सकाळी साडे दहा वाजता सुरभी गुळवेलकर-साठे यांचे प्रात्यक्षिक, सायंकाळी साडे पाच वाजता चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याबरोबर संवाद, 10 जून रोजी सकाळी साडे दहा वाजता दीपककुमार शर्मा यांचे प्रात्यक्षिक, सायंकाळी साडे पाच वाजता मिलिंद मुळीक आणि मंजिरी मोरे यांच्याबरोबर संवाद, 11जून रोजी सकाळी साडे दहा वाजता सायली भगली-दामले यांचे प्रात्यक्षिक, सायंकाळी 4 वाजता डॉ मुक्ता अवचट-शिर्के यांचे प्रात्यक्षिक अशी विविध सत्रे होणार आहेत. 11 जून रोजी सायंकाळी 6 वाजता समारोप कार्यक्रम (Pune ) होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.