Pimpri : पीसीईटी चे डॉ. प्रा. केतन देसले यांना पीएचडी प्रदान

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित ( Pimpri ) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) डॉ. प्रा. केतन संजय देसले यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी विभागातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

 

कंप्युटर इंजिनीअरिंग मधील डीप लर्निंग हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.या विषया अंतर्गत त्यांनी स्ट्रेमिंग डेटा (Streaming Data) मधील कन्सेप्ट द्रिफ्ट (Concept Drift) या समस्येला हाताळण्यासाठी नवीन अल्गोरिदम (Algorithm) विकसित केला आहे.

 

डॉ. प्रा. देसले यांनी त्यांच्या पीएचडी दरम्यान दोन आंतराष्ट्रीय परिषदेमध्ये आपले शोध निबंध सादर केले. त्यातील एका आंतरराष्ट्रीय परिषद मध्ये ब्रूनेल युनिव्हर्सिटी, लंडन, युनाइटेड किंग्डम (Brunel University, London, UK ) येथे त्यांना आपला शोध निबंध सादर करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषद (AICTE) कडून 1.20 लाख ट्रॅव्हल ग्रांट देखील मिळाली होती.

तर फेब्रुवारी 2022 मध्ये डॉ. प्रा. देसले यांनी ब्रुनेल युनिव्हर्सिटी, लंडन, युनायटेड किंग्डम (Brunel University, London, UK ) येथे जाऊन आपला शोध निबंध सादर केला. तसेच त्यांचे 3 शोधनिबंध हे आंतराष्ट्रीय दर्जाच्या जर्नल्स मध्ये (SCOPUS/ESCI/SCIE indexed)  प्रकाशित झाले आहेत.

पीसीसीओई च्या डीन संशोधन आणि विकास डॉ. स्वाती शिंदे यांनी देसले यांना मार्गदर्शन केले. कमी वयात पीएचडी पदवी प्राप्त केल्याने सर्वच स्तरातून डॉ. प्रा. देसले यांचे कौतुक होत आहे. “यंग लीडरशिप इन एज्युकेशन 2019 ” व “एएसएमए” (ASMA) टॉप 30 मार्केटर्स इन एज्युकेशन 2019 ” आदी पुरस्कार डॉ. प्रा. देसले मिळाले आहेत. सध्या ते पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या डिजिटल मार्केटिंग विभाग प्रमुख पदावर कार्यरत आहेत.

 

डॉ. प्रा. देसले यांच्या यशाबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी ( Pimpri ) अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.