Pune : ललित पाटील व त्याची मैत्रीण प्रज्ञा सह 14 जणावर मोक्का अंतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांनी ललित पाटील याला नुकतेच मुंबई पोलिसांच्या ताब्यातून स्वतःच्या( Pune )ताब्यात घेतले आहे. यावेळी ललित पाटील याच्यावरील कारवाईला वेग आला असून ललित पाटील व अरविंदकुमार लोहरे हे दोघे टोळी प्रमुख व ललित ची मैत्रीण प्रज्ञा कांबळे सह त्याच्या टोळीतील इतर 11 जण यांच्यावर मक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ललित अनिल पाटील (वय 37 रा. नाशिक) , (Pune) अरविंदकुमार प्रकाशचंद्र लोहरे (वय 39 रा.ओशिवरा, मुंबई) हे दोघे टोळी प्रमुख आहेत. यांच्या बरोबर काम करणारे अमित जानकी साह उर्फ सुभाष जानकी मंडल (वय25, रा. देहुरोड), रौफ रहिम शेख (वय 19, रा. ताडीवाला रोड पुणे) , भूषण अनिल पाटील (वय 34 रा. नाशिक) , अभिषेक विलास बलकवडे, (वय 35 रा.नाशिक), रेहान उर्फ गोलू आलम सुलतान अहमद अन्सारी ( वय 26 रा. मुंबई) प्रज्ञा अरुण कांबळे उर्फ प्रज्ञा रोहित माहिरे (वय 39 रा. नाशिक) , जिशान इकबाल शेख (वय 33 रा. नाशिक), शिवाजी अंबादास शिंदे (वय 40 रा. नाशिक), राहुल पंडीत ऊर्फ रोहितकुमार चौधरी ऊर्फ अमितकुमार (वय 30 रा. विरार ,पूर्व) हे आरोपी दाखल गुन्ह्यात निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

Chinchwad : चाकणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार , पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून विभागीय आयुक्तांना अहवाल सादर

तसेच दाखल गुन्ह्यात इतर समाधान बाबाजी कांबळे नाशिक) इम्रान शेख उर्फ अमीर खान, रा. धारावी मुंबई, हरिश्चंद्र उरावादत्त पंत(वय 29 रा. भोईसर, मुंबई) हे पाहीजे आरोपी आहेत.

कारवाईत पोलिसांनी म्हटले आहे की, आरोपीची रेकॉर्डची पाहणी करता नमूद गुन्हयातील आरोपी ललित अनिल पाटील व अरविंदकुमार प्रकाशचंद्र लोहरे, (टोळी प्रमुख) यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली. त्यामध्ये वेगवेगळे सदस्य घेवुन मागील 10 वर्षात टोळीतील सदस्यांनी एकटयाने किंवा संघटीतरित्या अंमली पदार्थचा साठा करणे, विक्री करणे, वाहतुक करणे व निर्मिती करणे, अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे.

यावरून आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, सन 1999 चे कलम 3(1) (ii) 3(2), 3 (4). 3 (5) व 4 या कलमाचा अंतर्भाव करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास आता गुन्हे शाखा एक चेसहायक पोलीस आयुक्त सुनिल तांबे हे करीत आहेत.पुणे पोलिसांनी मोका अंतर्गत केलेली सन-2023 या चालू वर्षातील एकुण 76 वी कारवाई आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.