Pune : सुरक्षित रस्त्याच्या मागणीसाठी वेद भवन परिसरातील हजारो रहिवाश्यांचा मूक महामोर्चा

एमपीसी न्यूज- हजारो रुपये खर्च करून वाहतूक समस्यांची कोंडी (Pune) सोडवल्याच्या श्रेयवादाच्या लढ्यात आणि समस्यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या पुणे-मुंबई महामार्गावीरल वेद भवन परिसराच्या विविध सोसायट्यांमधील हजारो रहिवाश्यांनी सुरक्षित रस्त्याच्या मागणीसाठी आज मूक महामोर्चा काढून विविध यंत्रणांचे लक्ष्य वेधून घेतले.

आजारापेक्षा इलाज भयंकर अशी कोथरूडकरांची  (चांदणी चौक परिसरातील सोसायटी रहिवाश्यांची) अवस्था झाली असून अनेक पातळ्यांवर (Pune) पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने या रहिवाशांनी आज आंदोलनचा पर्याय निवडला.  पुणे-मुंबई महामार्गावीरल वेद भवन परिसरातील सोसायट्यांमधील हजारो रहिवासी असुरक्षित रस्ते, विस्कळीत आणि धोकादायक वाहतूक आणि वाहतूक कोंडी यामुळे त्रस्त झाले आहेत. वाहतुकीच्या या समस्यांमुळे या परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर घातक परिणाम होत असून परिसरातील रहिवासी, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांच्याच जीवाला धोका निर्माण झाला आहे.

Alandi : सकल मराठा समाज आळंदी सर्कल यांचे नवव्या दिवशी साखळी उपोषण स्थगित

या धोकादायक परिस्थितीकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यापूर्वी निवेदन आणि मागणी पत्रांच्या माध्यमातून करण्यात आला. मात्र, तरीही पुणे-मुंबई महामार्गावीरल कोथरूड आणि वारजे परिसरातील हजारो रहिवाश्यांच्या समस्येकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने या धोकादायक परिस्थितीमुळे त्रस्त झालेले वेद भवन परिसरातील सोसायट्यांमधील हजारो रहिवासी त्यांच्या मागणीसाठी आज रस्त्यावर उतरले.


वेद भवन परिसरात काढण्यात आलेल्या या मूक महामोर्चामध्ये वेद भवन मंदिर, वेद विहार सोसायटी, रविराज रेसिडेन्सी, हेरंब रेसिडेन्सी, मनोहर रेसिडेन्सी-१, विश्वजीत अपार्टमेंट, साई प्रसाद अपार्टमेंट, सुयश अपार्टमेंट, सिध्दार्थ पार्क-ए, मनोहर रेसिडेन्सी-२, सिध्दार्थ पार्क-बी, श्रीरंग अपार्टमेंट, गौरांग अपार्टमेंट, वेदांत सोसायटी, सिध्दार्थ पार्क-सी, श्री समर्थ अपार्टमेंट, निर्माण निसर्ग अपार्टमेंट, सद्योजत अपार्टमेंट, वेदश्री, श्री राज व्हीला, रूणवाल साधना, श्रीशा एनक्लेव्ह, ओम रेसिडेन्सी को-ऑप. सोसायटी, श्री भारती तीर्थ कृपा या संकुलातील रहिवासी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.