Alandi : सकल मराठा समाज आळंदी सर्कल यांचे नवव्या दिवशी साखळी उपोषण स्थगित

एमपीसी न्यूज -सकल मराठा समाज आळंदी देवाची व आळंदी सर्कल (Alandi) यांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ 26 ऑक्टोबर पासून बेमुदत साखळी उपोषणास आळंदी येथील महाद्वार चौकात सुरवात झाली होती.

सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर राज्य सरकारला वेळ वाढवून देतो (Alandi)म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी काल उपोषण मागे घेतले आहे.मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकार गंभीर असून त्यासाठी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलवू असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांना दिले.

Talegaon Dabhade : रोटरी तर्फे टेरेस गार्डनिंग आणि शून्य माती संकल्पना कार्यशाळा

त्यावर 2 जानेवारी पर्यंत मी वेळ वाढवून देत असल्याचे सांगत जरांगे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला शेवटचा इशारा देत उपोषण मागे घेतले आहे.
याच पार्श्वभूमीवर आज( दि.3) साखळी उपोषणाच्या नवव्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता सकल मराठा समाज आळंदी सर्कल यांचे उपोषण स्थगित झाले.भविष्यात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील.

त्या निर्णया प्रमाणे कार्य करू.असे यावेळी ठरले.आजच्या उपोषण कर्त्यास व मागील काही दिवस साखळी उपोषण करणाऱ्या उपोषण कर्त्यास वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांच्या हस्ते लिंबू पाणी देत हे उपोषण सोडण्यात आले.यावेळी सकल मराठा समाज आळंदी सर्कल व मराठा आरक्षणासाठी पाठींबा देणाऱ्या विविध संस्था,पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी सर्व पाठींबा देणाऱ्या व्यक्ती,संस्था,पदाधिकारी यांचे आभार मान्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.