Talegaon Dabhade : रोटरी तर्फे टेरेस गार्डनिंग आणि शून्य माती संकल्पना कार्यशाळा

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या तर्फे लायन्स क्लब येथे (Talegaon Dabhade)रविवारी (दि. 29) टेरेस गार्डनिंग आणि शून्य माती संकल्पना कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत महाराष्ट्र वृक्ष संवर्धनीच्या सुप्रिया भिडे व डॉ. अनुराधा उपाध्ये यांनी टेरेसवर लावण्यात येणाऱ्या झाडांची निवड आणि निगा याबाबत मार्गदर्शन केले. शून्य मातीची संकल्पना आणि त्याचे फायदे यावेळी विषद करण्यात आले.

यावेळी सचिव रो.श्रीशैल मेंथे,रो विलास जाधव,रो संजय अडसूळ,रो मंगेश गारोळे,रो यादवेंद्र खळदे,(Talegaon Dabhade) शंकर जाधव,जयवंत देशपांडे,रो डॉ ज्योती मुंडर्गी,रो राजन आंब्रे, रो. धनंजय मथुरे,रो प्रमोद दाभाडे,ऋषिकेश कुलकर्णी व सर्व रोटेरियन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune :ताराचंद रुग्णालयातील विद्यार्थींनींच्या वसतिगृहात हिटरमुळे आग, सुदैवाने कोणी जखमी नाही

रविवार (दि 29) रोजी लायन्स क्लब येथे (Talegaon Dabhade)तळेगाव दाभाडे रोटरी तर्फे शून्य माती संकल्पनेची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत महाराष्ट्र वृक्ष संवर्धनीच्या सुप्रिया भिडे व डॉ अनुराधा उपाध्ये यांचे मार्गदर्शन लाभले. एकूण 80 निसर्ग स्नेही नागरिकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. डॉ अनुराधा उपाध्ये यांनी झाडांची निवड माती पाणी व प्रकाश नियोजन तसेच सेंद्रिय खते व कीटकनाशके यांचा वापर कसा करावा यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर प्रिया भिडे यांनी गच्चीवरील बाग शून्य माती संकल्पना कंपोस्टिंग यावर प्रात्यक्षिक व सुयोग्य मार्गदर्शन केले. रोजच्या वापरातील ओला कचरा टाकून न देता त्यातूनच बाग कशी फुलवता येईल याचा त्यांनी अचूक दृष्टिकोन दिला.

कार्यशाळा झाल्यानंतर यामध्ये सातत्य रहावे म्हणून स्थानिक मार्गदर्शक रूपक साने व मंगेश जोशी यांनी सहभागींना पुढील वर्षभर मदत करण्याकरिता पुढाकार घेतला. कंपोस्टिंग व बागेसंदर्भातील लोकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी ते रोटरीतर्फे सर्वांना सहकार्य करणार आहेत. रोटरी क्लब तळेगाव दाभाडे तर्फे सर्व सहभागींना कापडी पिशवी,कंपोस्ट, कोकोपीट व लवंग तुळस देण्यात आली,

प्रकल्प अधिकारी रोटेरियन राजू गोडबोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अध्यक्ष रो उद्धव चितळे यांनी रोटरीच्या कार्याविषयी सर्वांना माहिती दिली. पर्यावरण डायरेक्टर रो प्रसाद मुंगी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी अर्चना चितळे, कल्याणी मुंगी, दीपा कुलकर्णी , कीर्ती मोहरीर काजल गारोळे, रेणुका जाधव, संगिता जाधव, प्रसाद मुंगी, राजू गोडबोले या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.