Pune :ताराचंद रुग्णालयातील विद्यार्थींनींच्या वसतिगृहात हिटरमुळे आग, सुदैवाने कोणी जखमी नाही

एमपीसी न्यूज – पुण्यातील रास्ता पेठ, ताराचंद रुग्णालयामधील विद्यार्थीनींचे (Pune)असलेले वसतिगृहाला आज (शुक्रवारी) सकाळी पावणे नऊच्या सुमारास आग लागली. ही आग हिटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असून सुदैवाने यात जीवीत हानी नसून कोणी जखमी ही झालेले नाही.

आग लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन मुख्यालय व कसबा अग्निशमन केंद्र येथून (Pune)अग्निशमन वाहने रवाना करण्यात आल्या होत्या. आग लागल्याचे समजताच रुग्णालयात असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तेथे उपलब्ध असणारे अंदाजे 18 अग्निरोधक उपकरण (फायर एक्स्टिंग्युशर) वापरुन आग विझवण्याचा मोठा प्रयत्न केला होता.

PMPML : पीएमपीएमएल बसचे ॲपद्वारे तिकीट काढणे होणार शक्य, लवकरच घेणार ॲपचा डेमो

घटनास्थळी तळमजला व तीन मजले असलेल्या वसतिगृहात पहिल्या मजल्यावर खोली क्रमांक चारमध्ये आग लागली होती.अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रथम विद्यार्थीनी आणि वसतिगृहातील इतरांना इमारती बाहेर काढले. आग लागलेल्या खोलीत पाणी मारुन ती इतरत्र पसरु न देता सुमारे 10 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत खोलीमधील शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान व इतर वस्तु पुर्ण जळाल्या. आग खोलीमध्ये असणारया हिटर मुळे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

 


या कामगिरीत अग्निशमन अधिकारी पंकज जगताप, वाहनचालक सचिन चव्हाण, समीर शेख व तांडेल सुनिल नामे, संजय गायकवाड आणि जवान भुषण सोनावणे, सतीश ढमाळे, अक्षय शिंदे, परेश जाधव, केतन नरके, आतिश नाईकनवरे, शुभम देशमुख यांनी सहभाग घेतला.

अग्निशमन दलाकडून शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, विविध मॉल, इमारती व इतर ठिकाणी आग व आपत्कालिन परिस्थितीत काय उपाययोजना करावी तसेच मार्गदर्शनपर होणारी व्याख्याने यामुळे नक्कीच उपयोग होतो हे आज लागलेल्या आगीत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्राथमिक स्वरूपात वापरलेली अग्निरोधक उपकरणे नक्कीच महत्त्वाची ठरली.

– देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगरपालिका

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.