Chakan: चाकण मध्ये भव्य मशाल मोर्चा 33जणांना पोलिसांकडून नोटीस

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांकडून(Chakan) चाकण ( ता. खेड, जि. पुणे ) येथे गुरुवारी (दि. २ नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजता भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला.यावेळी आबालवृद्ध या मशाल मोर्चात सहभागी झाले होते.

मराठा आरक्षण मागणीच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने मशाल व कँडल मार्च काढण्यात आला होता. चाकण माणिक चौक ते शिवाजी विद्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा हा मोर्चा होता.

Chinchwad : तारांगणला गळती; दुरूस्तीच्या कामासाठी 20 लाखांच्या खर्चाला मंजुरी

डोक्यावर भगव्या टोप्या, एक मराठा-लाख मराठा,(Chakan) आरक्षण आमच्या हक्काचे-नाही कुणाच्या बापाचे व छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने हा मोर्चा शांततेत पार पडला. महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. मोर्चाच्या आयोजकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा पार पडेल असे नियोजन केले होते.

33 जणांना नोटीस :
चाकण मधील मराठा आंदोलनाची हिंसक पार्श्वभूमी पाहता चाकण मधील मशाल मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांनी अॅड.निलेश कड पाटील, अनिल देशमुख, व्यंकटेश सोरटे, राहुल वाडेकर, सचिन राक्षे आदी प्रमुख आंदोलनकर्त्यांसह 33जणांना नोटीस बाजावाली होती. मात्र चाकण मधील मशाल मोर्चा आयोजकांनी अत्यंत शांततेत काढल्याने पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. चाकण मधील मशाल मोर्चात चाकण आणि पंचक्रोशीतील नागरिक खूप मोठ्या संखेने सहभागी झाले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.