PMPML : पीएमपीएमएल बसचे ॲपद्वारे तिकीट काढणे होणार शक्य, लवकरच घेणार ॲपचा डेमो

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल ने क्यूआरकोडच्या कॅशलेस तिकीट (PMPML)विक्रीनंतर आता आणखीएकस्मार्ट पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना लवकरच मोबाईलवर तिकीट काढणे शक्य होणार आहे. शिवाय, बसचे लाइव्ह लोकेशनही देखील या ॲपद्वारे समजणार आहे.पुढील आठवड्यात या ॲपचा डेमो घेण्यात येणार आहे.

यासाठी ‘पेमेंट गेट वे’साठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडे (PMPML)प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच प्रवाशांना ऑनलाइन तिकीट काढता येईल. रेल्वे किंवा लोकल प्रमाणे मोबाईल ॲप वरून तिकीट काढण्याची सेवा मिळावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनची होत आहे. त्यासाठी ॲपचे काम पूर्ण झाले आहे. आवश्यक त्या चाचण्याही झाल्या आहेत. बँकेकडून ‘पेमेंट गेट वे’साठी मंजुरी मिळताच प्रवाशांना मोबाईलवरूनच तिकीट काढता येईल.

Chinchwad : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर महाविद्यालयाचे गायन स्पर्धेत यश

तसेच या ॲपद्वारे पीएमपी’च्या बसचे लाइव्ह लोकेशन समजावे म्हणून ‘गुगल’ च्या सूचनेवरून बस थांब्याचे व बस मार्गाचे मॅपिंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ‘पीएमपी’च्या वाहतूक शाखेच्या विशेष पथकाने मागील सहा महिन्यांपासून यासाठी डेटा गोळा करण्याचे काम केले. शिवाय, एका खासगी संस्थेकडून लॅटिट्यूड (अक्षांश व रेखांश) निश्चित करण्याचे कामही झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.