Chinchwad : तारांगणला गळती; दुरूस्तीच्या कामासाठी 20 लाखांच्या खर्चाला मंजुरी

एमपीसी न्यूज – आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, वातावरणातील बदल, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सुर्य, पृथ्वी आदीविषयी प्रत्यक्ष ऑप्टो-मेकॅनिकल आणि 2 डी डिजिटल तारांगण प्रणाली असलेल्या आणि खगोल शास्त्रातील (Chinchwad) शिक्षक व विद्यार्थी यांना खगोलशास्त्राची सर्व माहिती होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्कशेजारी तारांगण उभारण्यात आले आहे. मात्र, तारांगण उभारून पाच महिने होत नाही तोपर्यंत त्याला गळती लागली आहे. आता दुरूस्तीसाठी 20 लाखांच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील सायन्स(Chinchwad) पार्कशेजारी तारांगण उभारण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन 15 मे 2023 ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांत पावसाचे पाणी तारांगणाच्या डोममधून गळू लागले आहे. त्यामुळे पावसाळ्यात तारांगण प्रकल्प काही दिवस बंद ठेवण्यात आला होता. डोमच्या दुरुस्तीसाठी 20 लाखांचा खर्च करण्यात येणार आहे.

Pimpri : ऑक्‍टोबरमध्ये पिंपरी शहरात 81 जणांना डेंग्यूचा डंख

खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकांसह अनेकांना आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सूर्य, पृथ्वी आदींविषयी मोठ्या प्रमाणात कुतूहल आहे. अनेकजण खगोलशास्त्राचा अभ्यास करत आहेत. शहरातील विद्यार्थी, नागरिकांना खगोलशास्त्राची इत्यंभूत माहिती मिळावी, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे चिंचवड येथील सायन्स पार्कच्या बाजूलाच तारांगण प्रकल्प उभारला आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे 20 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तारांगण पाहण्यासाठी शहरातील विद्यार्थी, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, पावसाळ्यात तारांगणच्या आतमध्ये पाणी येऊ लागले. डोममधून पावसाचे पाणी गळू लागले. त्यामुळे तारांगणमधील शो बंद करण्यात आले. डोमची दुरुस्ती करणाऱ्या एजन्सीची संख्या कमी आहे. त्यामुळे या कामासाठी निविदा काढण्याचा निर्णय अ क्षेत्रीय स्थापत्य विभागाने घेतला आहे.

डोमच्या काचेच्या जॉईटमधून पावसाच्या पाण्याची गळती होऊ नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे. त्या जॉइंटला धातुची पट्टी बसविण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 20 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी निधीची तरतूद नव्हती. त्यामुळे प्रभाग क्रमांक 19 मधील नदीकाठचा 18 मीटर डीपी रस्ता विकसित करणे या लेखाशीर्षावर 1 कोटी 50 लाखांचा निधी आहे. त्यापैकी 20 लाखांचा निधी तारांगण दुरुस्तीसाठी वळविण्यात आला आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.