Pimpri : ऑक्‍टोबरमध्ये पिंपरी शहरात 81 जणांना डेंग्यूचा डंख

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ऑक्‍टोबरमध्ये तब्बल 81 रुग्णांना डेंग्यूची (Pimpri)लागण झाली. तर गेल्या चार महिन्यात 229 रुग्ण आढळले आहेत. गेल्या चार महिन्यांत प्रथमच ऑक्‍टोबरमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात जून महिन्यामध्ये शहरात एकही डेंग्यूचा रूग्ण (Pimpri)आढळला नाही. मात्र, जुलैमध्ये 1 हजार 432 संशयित रूग्णांची तपासणी केल्यानंतर 36, ऑगस्टमध्ये 2 हजार 145 रूग्णांची तपासणी केली असता 52, सप्टेंबरमध्ये 2 हजार 327 रूग्णांची तपासणी केल्यानंतर 60 तर ऑक्‍टोबरमध्ये 2 हजार 438 संशयित रूग्णांची तपासणी केल्यानंतर तब्बल 81 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे.

Pune : होस्टेलच्या भिंतीवर मोदींविषयी आक्षेपार्ह मजकूर, विद्यापीठात आज भाजपचे आंदोलन

गेल्या चार महिन्यांत शहरात 9 हजार 444 संशयित रूग्णांची तपासणी केल्यानंतर 229 डेंग्यूचे रूग्ण आढळले आहेत. तर, जानेवारी ते ऑक्‍टोबर या कालावधीत शहरातील 1 लाख 20 हजार 372 तापाच्या रूग्णांची तपासणी केली. यामध्ये गेल्या दहा महिन्यांत 17 मलेरियाचे रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जूनमध्ये 5 तर ऑगस्टमध्ये 6 असे सर्वाधिक रूग्ण आढळले होते. एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

पावसाळ्यात काही प्रमाणात डबकी साचून राहतात. अशा डबक्‍यात डेंग्यूचे डास अळ्या घालतात. त्यामुळे पावसाळ्यात डेंग्यूचे रूग्ण वाढतात. मात्र, आता पाऊस संपला असताना डेंग्यूच्या रूग्णांची संख्याही कमी होण्याची शक्‍यता असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.