Pune : ‘ड्रग्ज माफिया’ ललित पाटीलकडून आणखी 5 किलो सोने जप्त

एमपीसी न्यूज – ससून रुग्णालय ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी (Pune)आणि ड्रग्ज माफिया ललित पाटील कडून पुणे पोलिसांनी आणखी 5 किलो सोने जप्त केले आहे.

 

गुरुवारी पुणे पोलिसांची एक टीम ललित पाटीलला घेऊन नाशिकला (Pune) गेली होती. त्यावेळी हे सोने जप्त करण्यात आले. ललितने अंमली पदार्थ विकून मिळालेल्या पैशांतून सोने विकत घेतले होते.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद

याआधी पुणे पोलिसांनी त्याच्याकडून तीन किलो सोने, दोन मोटारी, 14 लाख रूपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते.

अंमली पदार्थ तयार करणाऱ्या ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांवर पुणे पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.