Pune : डेक्कन कॉलेजमध्ये भाषा आणि संस्कृती या विषयावर आंतरराष्ट्रीय संस्कृत संमेलनाचे आयोजन

एमपीसी न्यूज – डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ) पुणे तसेच (Pune)वैश्विक संस्कृत मंच या दोन प्रसिद्ध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 27-28 ऑक्टोबर रोजी ‘भाषा आणि संस्कृती’ या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित दोन दिवसीय द्वितीय आंतरराष्ट्रीय संस्कृत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात देश-विदेशातील काही विद्वानांची विशेष व्याख्यानेही आयोजित केलेली होती.

समारंभामध्ये अध्यक्ष म्हणून डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे ( Pune )मा. कुलगुरु प्रा. प्रमोद पांडे, उद्घाटक – डॉ. बालमुकुंद पांडे (अखिल भारतीय इतिहास संकलन योजना प्रमुख), प्रमुख पाहुणे – श्री लाल बहादुर शास्त्री संस्कृत विद्यापीठाचे मा. कुलगुरु प्रा. मुरली मनोहर पाठक, विशेष व्याख्यानासाठी वैश्विक संस्कृत मंचचे मा. राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. विष्णुपद महापात्र, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे मा. उपकुलगुरु प्रा. प्रसाद जोशी, वैश्विक संस्कृत मंच महाराष्ट्र प्रांताच्या अध्यक्षा प्रा. जयश्री साठे, उपाध्यक्ष डॉ. मंजूषा कुलकर्णी इत्यादि विद्वज्जन उपस्थित होते.

Chakan: चाकण मध्ये भव्य मशाल मोर्चा 33जणांना पोलिसांकडून नोटीस

त्यात लिथुआनिया हून आलेले Prof. Vytis Vidunas यांचे ” संस्कृत आणि लिथुआनियन भाषा: भाषाशास्त्र आणि ऐतिहासिक नोट्स ” या विषयावर विशेष व्याख्यान झाले. हे संमेलन 14 सत्रे ऑनलाइन तर 10 सत्रे ऑफलाईन अशा एकूण 24 सत्रांमध्ये जवळजवळ 250 पेक्षा जास्त संशोधकांनी ‘भाषा आणि संस्कृती’ या मुख्य विषयावर विविध अंगाने शोधनिबंध सादर केले.

यावेळी कार्यक्रमात प्रा. प्रसाद जोशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. ऋचा अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले. या संमेलनाचे समापन सत्र 28 तारखेला दुपारी पार पडले. यात प्रा. रविन्द्र मुळ्ये, प्रा. विष्णुपद महापात्र, प्रा. देवनाथ त्रिपाठी, डाॅ. व्ही. सुब्रह्मण्यम् या विद्वज्जनांची विशेष उपस्थिती होती. या संमेलनात संस्कृतच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दोन ज्येष्ठ विद्वानांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

प्रा. भाग्यलता पाटसकर यांना महामहोपाध्याय प्रा. पी. जी. लाळ्ये आंतरराष्ट्रीय स्मृती पुरस्कार 2023 तर प्रा. पूर्णचंद्र साहू यांना प्रा. सत्यव्रत शास्त्री आंतरराष्ट्रीय स्मृती पुरस्कार 2023 यांनी सन्मानित करण्यात आले. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी डॉ. राजेश कुमार मिश्र (सचिव,वैश्विक संस्कृत मंच, भारत), डॉ. अतुल मस्के, संदीप ढिकले, डॉ. भव शर्मा, डॉ. हरी पालवे, डॉ. राहुल, डॉ. शंतनु वैद्य, डॉ. श्रीधर लोहोकरे यांनी विशेष सहकार्य केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.