Pune : कुशल क्रेडाईच्या माध्यमातून मेट्रोचे अभियंते आणि तंत्रज्ञांचे होणार ‘अप स्कीलिंग’

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम प्रकल्पावरील (Pune) अभियंते आणि तंत्रज्ञ यांचे अद्ययावतीकरण अर्थात ‘अप स्कीलिंग’ करण्याच्या हेतूने विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा क्रेडाई – पुणे मेट्रोच्या कुशल उपक्रमाचे अध्यक्ष जे पी श्रॉफ यांनी केली.

क्रेडाई- पुणे मेट्रोच्या कार्यालयात या प्रशिक्षणासंदर्भात बांधकाम प्रकल्पावरील अभियंते आणि तंत्रज्ञ यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात श्रॉफ बोलत होते. क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे, कुशल क्रेडाईच्या समितीचे सदस्य समीर बेलवलकर, कपिल त्रिमल, क्रेडाई कार्यालयातील जनरल मॅनेजर (तांत्रिक) पल्लवी कोठारी, समीर पारखी यांबरोबरच क्रेडाई – पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी के अभ्यंकर, सरव्यवस्थापक उर्मिला जुल्का आदी उपस्थित होते.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कुशल क्रेडाई – पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम प्रकल्पावरील अभियंत्यांसोबतच पर्यवेक्षक, स्टोअर मॅनेजर, सुरक्षा अधिकारी अशा तांत्रिक कर्मचाऱ्यांना विविध (Pune) विषयांच्या अभ्यासक्रमांच्या मदतीने कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येणार असून येत्या 1 एप्रिलपासून विविध अभ्यासक्रमांचा समावेश असलेले हे प्रशिक्षण सुरू करण्याचा आमचा मानस आहे, असे श्रॉफ यांनी यावेळी नमूद केले.

अभ्यासक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे मूल्यांकन करून नंतरच त्यांना अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचे सांगत पल्लवी कोठारी म्हणाल्या, “बांधकाम क्षेत्रातील नवे कौशल्य आणि प्रशिक्षणाची माहिती यांची आवश्यकता लक्षात घेत आम्ही हे अभ्यासक्रम सुरु करीत आहोत. यामध्ये बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सहभागी व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.”

कसा असेल अभ्यासक्रम –

अभ्यासक्रमाअंतर्गत अनेकविध कार्यशाळा, क्लासरूम प्रशिक्षण यांबरोबरच बांधकाम प्रकल्पावरील प्रात्यक्षिके यांचा समावेश असणार असून अभ्यासक्रमानुसार यांचा कालावधी हा 15 दिवसांपासून 3 महिन्यांपर्यंतचा असेल. अभ्यासक्रमाअंतर्गत साईट प्लॅनिंग वर्कशॉप, तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी आरपीएल संदर्भातील अभ्यासक्रम, प्रकल्पावरील दिवसाचे नियोजन, प्रकल्पाच्या ठिकाणची सुरक्षितता, प्रकल्प व्यवस्थापन, सामग्री व्यवस्थापन, महारेरा मधील तांत्रिक कर्मचाऱ्यांची भूमिका आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

याबरोबरच गुणवत्ता व्यवस्थापन, प्रगत तंत्रज्ञान, हरित बांधकाम आणि बांधकाम उद्योगातील विविध सॉफ्टवेअर्स आदी विषयांवर देखील कार्यशाळा होणार आहेत.

Mobile theft : अन ते 57 मोबाईल गेले कुठे…?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.