Pune : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी मोहोळ, घाटे, भिमाले उपस्थित

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय (Pune)अधिवेशनासाठी नवी दिल्ली येथे आज प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी हजेरी लावली.

राष्ट्रीय अधिवेशनात प्रवेशाची नोंदणी करताना (Pune)पूर्णपणे डिजीटल पद्धतीचा वापर करत QR कोडद्वारे प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या‘डिजीटल इंडिया’च्या आवाहनाला अनुसरुन केलेली ही व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होती, अशी माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Pimpri :लोकमान्य हॉस्पिटलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त “लोकमान्य सुवर्ण आरोग्य योजना”

दरम्यान, आगामी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांचे नाव आघाडीवर आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येत्या काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. या निवडणुकीसाठी पुण्यातून मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय नाना काकडे, माजी आमदार जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर यांचे नाव आघाडीवर आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.