Pune: राज्यातील सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या पुण्यात – जिल्हाधिकारी डॉ. देशमुख

रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. : Most corona tests in the state in Pune - Collector Dr. Deshmukh

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या जास्त आहे हे खरे आहे. पण, राज्यातील सर्वाधिक चाचण्या पुण्यात होत आहेत. साहजिकच जेवढ्या जास्त चाचण्या होतील. तेवढे जास्त पॉझिटीव्ह रुग्ण सापडणार आहेत. याबरोबरच रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. जुलैमध्ये 50 टक्के होते. आज तेच प्रमाण 75 टक्यांवर आहे. म्हणजे रिकव्हरी रेट चांगला असल्याचे पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. याचे श्रेय आरोग्य यंत्रणेला निश्चितपणे द्यावे लागेल, असेही ते म्हणाले.

गेल्या आठवड्यातील ‘सिरो’ सर्वेनुसार हे स्पष्ट झाले आहे की लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्या आहेत असेही त्यांनी सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. देशमुख बोलत होते.

ते पुढे म्हणाले, पुण्यात सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत. 1 जुलैला दिवसाला 15 हजार चाचण्या केल्या जात होत्या. दोनदिवसांपूर्वी दिवसाला 53 हजार चाचण्या केल्या आहेत. आठवड्यातील चाचण्यांचा आढावा घेतला तर 1 जुलैला 38 हजाराच्या आसपास चाचण्या झाल्या.

तर मागच्या आठवड्यात जवळपास 75 हजारापर्यंत चाचण्या झाल्या आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पण झाले आहे. चाचण्या वाढल्यामुळे पॉझिटीव्ह रुग्ण जास्त प्रमाणात दिसून येत आहेत.

मोठ्याप्रमाणात रुग्ण आयसोलेट केले आहेत. संभाव्य परिस्थिती विचारात घेता सुविधा पुरेशा प्रमाणात आहेत.

दोन्ही महापालिका, आरोग्य विभाग, महसूल विभागाच्या समन्वयातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे निश्चितच पुढच्या दोन तीन आठवड्यात कोरोनाची वाढ स्थिर झालेली दिसेल.

गणेशोत्सवात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. सर्वंजण मिळून कोरोनाला नक्की हरवूया आणि कोरोनाची युद्ध जिंकू याची मला खात्री आहे, असा विश्वासही डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.