Inter District ST Bus Service : मोठी बातमी ! राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी

एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे. : Big news! Permission for inter-district ST travel in the state

एमपीसी न्यूज – राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. मात्र, एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे.

मराठी वृत्तवाहिनी ‘एबीपी माझा’ने याबाबत वृत्त प्रसारित केले आहे. कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे 25 मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद होती.

परंतु, आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. मात्र, खासगी वाहनांसाठी ई-पास लागू राहणार आहे.

याआधी परिवहन विभागाने मे महिन्यात आंतरजिल्हा एसटी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, लोकांच्या मनात जबरदस्त भीती होती.

त्यावर रेड झोनमधून इतर जिल्ह्यामध्ये माणसं पाठवू नका, कोरोना पसरवू नका, अशा तक्रारी आमच्याकडे आल्या. काही लोकांनी विरोध केला, त्यामुळे आम्ही ताबडतोब आंतरजिल्हा एसटीचा निर्णय स्थगित केला, असं स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलं.

तसंच आंतरजिल्ह्यात टप्प्याटप्प्याने सेवा सुरु करण्याचा विचार असल्याचंही ते म्हणाले होते. त्यानुसार आता राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. मात्र, एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.