Pune : सासूचा त्रास असह्य झाला; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

एमपीसी न्यूज : पुण्यातील बंडगार्डन (Pune) परिसरात एका विवाहितेने सासूच्या छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. सतत शारीरिक आणि मानसिक त्रास होत असल्याने तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ताडीवाला रोड परिसरात ही घटना घडली.

राजश्री कांबळे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिची सासू नागम्मा चनप्पा कांबळे (वय 50) तिच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकुंतला शीरसेल दिडीमनी (वय 50) यांनी याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Haveli : माझ्यावर कारवाई करणार्‍यांना हवेली तालुका समजून घेण्यास दहा जन्म घ्यावे लागतील – विकास दांगट

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, डिसेंबर 2022 मध्ये राजश्री कांबळे यांचे लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून सासू किरकोळ कारणावरून वारंवार तिला त्रास देऊन घालून पाडून बोलत असे. सततच्या होणाऱ्या या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून राजश्री कांबळे यांनी शुक्रवारी (Pune) सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.