Pune-Mumbai Train News : मुंबईत मुसळधार पाउस; पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या दहा रेल्वे रद्द

एमपीसी न्यूज – मुंबई परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. (Pune-Mumbai Train News) अनेक भागांत पाणी साचले आहे. रेल्वे मार्ग देखील पाण्याखाली गेल्याने पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या दहा महत्वाच्या रेल्वे गुरुवारी (दि. 20) रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई मध्ये मंगळवार (दि. 18) पासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

मुंबईत मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. रेल्वे मार्ग पाण्यात गेल्याने उपनगरीय रेल्वे वाहतूक खोळंबली आहे.

मुंबई पाठोपाठ घाट परिसरात देखील मोठ्या स्वरुपात पाऊस पडत (Pune-Mumbai Train News) आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या दहा रेल्वे गुरुवारी रद्द केल्या आहेत.

 

पुणे-मुंबई दरम्यान रद्द केलेल्या रेल्वे –

डेक्कन क्वीन (12124)
सिंहगड एक्सप्रेस (11010)
डेक्कन एक्सप्रेस (11008)
इंटरसिटी एक्सप्रेस (12128)
इंद्रायणी एक्सप्रेस (22106)

मुंबई-पुणे दरम्यान रद्द केलेल्या रेल्वे –

डेक्कन क्वीन (12123)
सिंहगड एक्सप्रेस (11009)
डेक्कन एक्सप्रेस (11007)
इंटरसिटी एक्सप्रेस (12127)
इंद्रायणी एक्सप्रेस (22105)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.