Pune : एसएसपीयु तर्फे  इनोवेटिव्ह टिचिंग वरील  राष्ट्रीय परिषद संपन्न  

एमपीसी न्यूज –  सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल  युनिव्हर्सिटी (एसएसपीयु) तर्फे नुकतेच ‘इनोवेटिव्ह टिचिंग लर्निंग अँड ट्रेंनिंग इन हायर एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद महाराष्ट्रातील पहिले कौशल्य आधारित विद्यापीठ एसएसपीयु आणि देशातील अग्रेसर दूरस्थ शिक्षण देणारे सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (एसीसीडीएल) यांच्या सहयोगाने  (Pune) एसएसपीयुच्या मुख्य सभागृहात पार पडली.  

यावेळी डॉ. श्यामल मजुमदार, माजी संचालक, युनेस्को, युनिव्होक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वेस्ली टेटर( वरिष्ठ सल्लागार, एज्युकेशनल इनोव्हेशन अँड स्किल डेव्हलोपमेंट, युनेस्को, बँकॉक आशिया पॅसिफिक रिजिनल ब्युरो ऑफ एजुकेशन) आणि  मनीष जोशी (प्रकल्प अधिकारी,युनेस्को, युनिव्होक, जर्मनी) ह्या प्रमुख वक्त्यांनी उपस्थितांना ऑनलाईन पद्धतीने  उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Bhosari : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भोसरी एमआयडीसी परिसरात उद्योजकांतर्फे वृक्षारोपण

कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार या उद्घाटनपर भाषणात म्हणाल्या की , भारताची अधिकाधिक लोकसंख्या ही तरुण वर्गाची असून ही भारतासाठी विशेष बाब आहे. मात्र ह्या लोकसंख्येला जर कौशल्य विकासाकडे वळवले नाही तर लोकसंख्याशास्त्रीय लाभांश देखील लोकसंख्याशास्त्रीय आपत्ती बनू शकते. शिक्षकांनी कौशल्यशिक्षणाचे महत्व समजून घेऊन विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण रोजगारक्षम बनवले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना रोजगार निर्मितीसाठीसुद्धा प्रोत्साहन दिले पाहीजे.

ही परिषद  ‘इनोव्हेटिव्ह टीचिंग अँड लर्निंग थ्रू टेक्नॉलॉजी या संकल्पनेवर आधारित होती. यामार्फत उपस्थितांना शैक्षणिक क्षेत्रात नव्याने उदयास येत असलेल्या  संकल्पना बाबत मार्गदर्शन मिळाले. ह्या परिषदेमध्ये अध्यापन शिक्षण तंत्रज्ञानामध्ये ऑनलाइन संसाधनांचा वापर कसा करावा,व्हर्च्युअल क्लासेस कसे आयोजित करावे, शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये आयसीटी साधनांचा वापर कसा करावा, मुक्त शैक्षणिक संसाधने अशा विविध विषयांवर चर्चासत्रे घडून आली.ह्या परिषदेच्या माध्यमातून उपस्थितांना  नेटवर्किंग, उद्योग क्षेत्रातील तज्ञांना भेटण्याची, कल्पनांची देवाणघेवाण करण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची संधी प्राप्त (Pune) झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.