Pune : अन् अजित पवार पत्रकाराला म्हणाले सावकाश माझ्या डिक्शनरीत नाही रे

एमपीसी न्यूज : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नेहमीच अनेक कारणांसाठी चर्चेत असतात. (Pune) त्यातच अजित पवारांची मिश्किल वक्तव्य देखील तेवढीच चर्चेचा विषय ठरतात. आज देखील असाच एक किस्सा पुण्यात पत्रकारांना पहायला मिळाला.

 

Pune : हल्ली कुरमुड्या ज्योतिषांची संख्या वाढली आहे – दीपक केसरकर

वारजे येथील एका कार्यक्रमासाठी अजित पवार हे आले होते.त्यावेळी कार्यक्रम होताच.अजितदादा तडक पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी गाडी जवळ येत असल्याचे दिसताच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनी बाइट म्हणताच त्यावर अजित पवार म्हणाले,मला बोलायचे नाही विषय संपला पुढच्या (Pune) कार्यक्रमाला जायला उशिर झाला आहे. ये पीए पुढे बस अस अजित पवार म्हणताच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीमधील एक जण म्हणाला,दादा सावकाश जा, त्यावर अजित पवार म्हणाले,अरे बाबा सावकाश माझ्या डिक्शनरीत नाही रे.. असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.