Pune : हल्ली कुडमुडे ज्योतिषांची संख्या वाढली आहे – दीपक केसरकर

संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांना टोला

एमपीसी न्यूज : हल्ली कुडमुडे ज्योतिषांची संख्या वाढली असून त्यांच्यातील उपनेत्या या भविष्य सांगायला लागल्या आहेत. ज्योतिषावर जर राज्याच भविष्य ठरायला लागल.तर महाराष्ट्र राज्य काय म्हणण्यास अर्थ आहे. रोज कोणी तरी काही तरी बोलत असते. हे कुठे तरी थांबले पाहिजे.(Pune)मात्र हे कुठे ही थांबताना दिसत नाही. ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच तरी ऐकतात की नाही.याबाबत मला एक शंकाच आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याने समजवून सांगण्याची गरज आहे.अशी भूमिका शिवसेनेचे नेते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मांडत. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांना टोला लगावला.

 

Marathi Sahitya Sammelan : 97 वे साहित्य संमेलन अमळनेरला होणार; साहित्य महामंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यात शिंदे फडणवीस सरकार येऊन जवळपास नऊ महिन्याचा कालावधी लोटला आहे.मात्र शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यामध्ये रोज आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत असताना. पंधरा दिवसात राज्यातील सरकार पडेल असे विधान ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले.(Pune) तसेच त्याच दरम्यान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील शिंदे गटावर निशाणा साधला.त्याबद्दल मंत्री दीपक केसरकर यांना विचारले असता. संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.