Marathi Sahitya Sammelan : 97 वे साहित्य संमेलन अमळनेरला होणार; साहित्य महामंडळाच्या बैठकीत निर्णय

एमपीसी न्यूज : वर्धा येथे 96 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन दोन महिन्यांपूर्वीच झाले. त्यानंतर आता 97 व्या संमेलनाच्या स्थळ आणि तारखेची घोषणा झाली आहे.(Marathi Sahitya Sammelan) जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे हे संमेलन होणार आहे. साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

या संमेलनासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि औदुंबर (जि. सांगली) खानदेशातील जळगाव जिल्ह्यात अमळनेर, तर मराठवाड्यातून जालना जिल्ह्यातील प्रस्ताव होता. यातून अखेर अमळनेरची निवड करण्यात आली.

साहित्य महामंडळाच्या बैठकीत ठरल्यानुसार, साने गुरुजींच्या कर्मभूमीत म्हणजेच जळगावच्या अमळनेरमध्ये पुन्हा साहित्य रसिकांचा मेळा भरणार आहे. 97 वे साहित्य संमेलन साने गुरुजींच्या कर्मभूमीत होणार आहे. 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फे स्थळनिवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. रमेश वंसकर, श्री. प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनिताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक हे होते.

Pune : मुंबई-बंगळुर महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हाधिकाऱ्यांकडून विचारपूस

स्थळनिवड समितीने औदुंबर आणि अमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. संमेलन आयोजनाची तयारी आणि कार्यक्षमता यांचा विचार करून स्थळनिवड समितीने (Marathi Sahitya Sammelan) सर्वानुमते मराठी वाङमय मंडळ, अमळनेर या संस्थेची शिफारस केली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्याला मान्यता दिली. अमळनेरमध्ये दुसऱ्यांदा साहित्य संमेलन होत आहे.

पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत, महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उपा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस समिती सदस्यांव्यतिरिक्त श्री. प्रकाश पागे, प्रा. मिलिंद जोशी, जे. जे. कुलकर्णी, दादा गोरे, दगडू लोमटे, डॉ. विद्या देवधर. अ. के. आकरे व प्रकाश गर्ने हे सदस्य उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.