Kamshet : कामशेत रेल्वे स्थानकावर तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – कामशेत रेल्वे स्थानकावर (Kamshet) तरुणाचा खून झाल्याची घटना रविवारी (दि. 23) दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

संतोष महादेव घाटे (रा. फिरस्ती. मूळ रा. अमरावती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विजय सतू भोंडवे (वय 22, रा. भाजगाव, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Pune : हल्ली कुरमुड्या ज्योतिषांची संख्या वाढली आहे – दीपक केसरकर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत रेल्वे स्थानकावर एका तरुणाचा खून झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कामशेत पोलिसांनी परिसरातील (Kamshet) सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.