Pune News : सक्रिय रुग्ण तब्बल 25 हजारांनी घटले तरीही, व्हेंटिलेटर बेड मात्र अद्याप फुल्लच

एमपीसी न्यूज – गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे एकूणच बाधितांची संख्या कमी झाली आहे, तरी गंभीर रुग्णांची संख्या अद्यापही दीड हजारांपर्यंत आहे. यातील अनेक रुग्ण अतिशय गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटर लावले आहे. सद्य:स्थितीत ऑक्सिजन बेड शिल्लक राहात आहेत; परंतु व्हेंटिलेटर बेड मात्र अद्याप फुल्लच आहेत. मागणी मात्र पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे दिसून येत आहे.

गेल्या 15 दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वेगाने कमी होत आहे, परंतु त्या तुलनेत गंभीर रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे व्हेंटिलेटर बेडची मागणी अद्यापही पूर्णपणे कमी झाली नसल्याचे ‘डॅशबोर्ड’ आणि एकूण आकडेवारीवरून दिसून येते.

कोरोना बाधितांची वेगाने वाढणारी संख्या लक्षात घेता महापालिकेने फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून 10 हजार 790 बेडची व्यवस्था केली. त्यातील 7 हजार 256 बेड ऑक्सिजन आणि आयसीयुमधील व्हेंटिलेटर असलेली 806 बेडची व्यवस्था केली आहे.

सध्या व्हॅटिलेटर बेडची मागणी कमी झाली नसली, तरी अ‍ॅव्हरेजचा विचार केला तर मार्च एप्रिलमध्ये व्हेंटिलेटर बेडसाठी दिवसाला जर दहा कॉल्स येत असतील तर आताच्या परिस्थितीत एक किंवा दोन कॉल्स येत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.