Pune News : आंबिल ओढा सरळीकरणाच्या निषेधार्थ धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज – महापालिकाच्या माध्यमातून आंबिल ओढा सरळीकरण विषय सध्या गाजत आहे. पण, हा विषय खूप गंभीर असून ओढा सरळ केल्याने परिसरातील लोकवस्तीला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे परिसरात नागरिकांनी बुधवारी आंबिल ओढा सरळीकरणाच्या निषेधार्थ धरणे आंदोलन केले

दांडेकर पूल, 130 दांडेकर पूल झोपडपट्टी, 999 दत्तवाडी, 128 हनुमान नगर, फाळके प्लॉट दत्तवाडी, 1003/05 राजेंद्र नगर झोपडपट्टी व विवेक श्री सोसायटी, श्यामसुंदर गोकुळ वृंदावन सोसायटी, फाटक बाग, आनंद बाग हा सर्व भाग आंबिल ओढा सरळीकर केल्याने पाण्याखाली  जाऊन जीवित व वित्त हानी होऊ शकते.

आंबिल ओढ्याचा इतिहास पाहता 2019 – 2020 च्या दरम्यान महापूर घटनेने महाराष्ट्र हादरवला होता. दांडेकर पूल भागापासून पुढचा भाग हा उताराचा असून सखल आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासियांनी विरोध केला आहे. यासंबधीचे पत्र आंबिल ओढा बचाव कृती समितीने पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना दिले.

मात्र, प्रशासन अजूनही तुघलकी पद्धतीने मनमानी कारभार करत आहे. त्यामुळे आंबिल ओढा सरळीकरणाच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आल्याची माहिती बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष किशोर कांबळे यांनी दिली.
या आंदोलनावेळी आंबिल ओढा बचाव कृती समिती, नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.