Pune News : स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्षाचे योगदान मोलाचे – डॉ. पी. ए. इनामदार

एमपीसी न्यूज – ‘‘काँग्रेस पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेतला. महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग स्विकारून विविध आंदोलने केली. त्या काळात एक म्हण असायची की ब्रिटीश साम्राज्यात सूर्य कधी मावळत नाही. परंतु, महात्मा गांधींच्या सत्याग्रही आंदोलनामुळे ती म्हण खोटी ठरली, ’’असे महाराष्ट्र कॉस्मॉपॉलीटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी सांगितले. 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त ‘‘व्‍यर्थ न हो बलिदान’’ या अभियानाच्या अंतर्गत छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन डॉ. इनामदार हस्ते करण्यात आले.

या वेळी पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, शरद रणपिसे, बाळासाहेब शिवरकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, आबा बागुल, अरविंद शिंदे, सोनाली मारणे, संगीता तिवारी, निता परदेशी, अविनाश बागवे, रमेश अय्यर, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, सचिन आडेकर, सेवादलाचे प्रकाश पवार, चैतन्य पुरंदरे, राहूल तायडे, अक्षय सोनावणे आदी उपस्थित होते.

डॉ. इनामदार म्हणाले, ‘‘अहिंसेच्या मार्गाने आणि क्रांतिकारकांनी केलेल्या क्रांतीमुळे भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. या छायाचित्रांमार्फत स्वातंत्र्य चळवळीचे अनेक टप्पे दाखविण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यांच्या चळवळीत आणि देशाच्या प्रगतीसाठी काँग्रेस पक्षाने केलेले कार्य समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोचविले पाहिजे. फक्त पदाशी बांधिलकी न ठेवता पक्षाशी बांधिलकी ठेवली पाहिजे.’’

अॅड. छाजेड यांनी काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळ आणि काँग्रेस हे शब्द एकमेकांपासून वेगळे काढता येणार नाहीत. देशासाठीचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. कोणी तसा प्रयत्नही करू नये.

रमेश बागवे म्हणाले, ‘‘भारताचा खरा इतिहास नष्ट करण्याचे काम सध्याचे केंद्रातील सरकार करीत आहे. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. काँग्रेस पक्षाचा उज्वल इतिहास नव्याने पुढे आणला पाहिजे. काँग्रेससाठी सच्चा भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे शिबिर भरवून गावोगावी काँग्रेसचे विचार पोचविले पाहिजेत.’’

सोनाली मारणे यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.